काशी विश्वनाथ मंदिरात ड्रेस कोड, 'या' कपड्यांतच करु शकणार शिवलिंगाला स्पर्श

काशी विश्वनाथांच्या सध्याचं मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकरांनी 1780 मध्ये बांधले होते.

वाराणसी | वाराणसीमधील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पुरूष आणि महिलांसाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. नव्या ड्रेसकोडनुसार, काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी पुरूषांना धोतर आणि कुर्ता परिधान करणे आवश्यक असणार आहे. तर महिलांना साडी परिधान अनिवार्य असेल. पॅन्ट, शर्ट, जीन्स परिधान केलेल्या व्यक्तींना लांबून दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यांना शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेऊ दिले जाणार नाही.

स्पर्श दर्शनाची वेळ वाढेल
काशी विश्वनाथ मंदिरामध्ये स्पर्श दर्शनसाठी ड्रेस कोड लागू होईल. यासोबतच स्पर्श दर्शनाची वेळही वाढवण्यात येत आहे. रविवारी मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. काशी विद्वत परिषदच्या विद्वानांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऐतिहासिक काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन-पूजनाची व्यवस्था ठरवण्याविषयी सूबेचे धर्मार्थ कार्य मंत्री नीलकंठ तिवारींच्या अध्यक्षतेखाली मंदिर प्रशासन आणि काशी विद्वत परिषद सदस्यांची बैठक झाली.

काशी विश्वनाथांच्या सध्याचं मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकरांनी 1780 मध्ये बांधले होते. यानंतर महाराजा रणजीत सिंह यांनी 1853 मध्ये 1000 किलोग्रॅम शुध्द सोन्याने त्याचा कळस उभारला होता. काशीला भगवान शंकराची राजधानी म्हणून ओळख आहे. स्वतः भगवान शंकराने निवडलं होतं आणि माता पार्वतीसोबत ते येथे निवास करतात असेही मानले जाते.

काशी विश्वनाथ ज्योर्तिंलिंग दोन भागांमध्ये आहे. उजव्या भागात शक्तिच्या रूपात देवी भगवती विराजमान आहेत. तर दुसऱ्या बाजूला महादेव हे वाम रूपात विराजमान आहेत. त्यामुळे काशीला मुक्त क्षेत्रही म्हटले जाते. दरम्यान, विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीमध्ये पूजले जाते. पूर्वी झालेल्या आक्रमणांमध्ये काशीचं मूळ मंदिर पाडून टाकण्यात आले होते. अनेक शतके तशीच गेली. यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिराती उभारणी केली. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढवला होता.AM News Developed by Kalavati Technologies