हैदराबाद बलात्काराच्या गुन्हेगारांना जनतेच्या हवाली करा, जया बच्चन यांचा संताप

या घटनेनंतर राज्यसभेत खासदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली | हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर साममूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. या घटनेनंतर राज्यसभेत खासदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जया बच्चन यांनीही तीव्र भाषेत या सर्व घटनेचा निषेध केला. आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन म्हणाल्या की, बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात जनतेच्या स्वाधीन करण्यात यावं. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं लागेल असेही त्या म्हणाल्या आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies