पीडितेच्या कुटुंबियांची मदत करण्याऐवजी योगी सरकार आरोपींची मदत करीत आहे, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

हाथरस प्रकरणात योगी सरकार आरोपींची मदत करत असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी केली आहे

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसच्या वतीने डिजिटल मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत राहुल गांधींनी आपला व्हिडिओ जारी करत, योगी सरकार हाथरस प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले आहे की, 'काही दिवसांपुर्वी मी हाथरसला गेलो होतो. पहिल्या वेळेस मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाऊ दिलं नाही. मात्र दुसऱ्या वेळेस मी गेलो. मला पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यास का अडवलं. मी पीडितेच्या कुटुंबियांशी भेटलो तर, सरकार पीडितेच्या कुटुंबियांवर आक्रमण झाली आहे.' असे राहुल यांनी सांगितले आहे.

सरकारचं काम आरोपींना शिक्षा देण्याचं असतं मात्र युपीतील योगी सरकार न्याय देण्याच्या ऐवजी आरोपींना रक्षा देत आहे. तसेच युपी सरकारने आरोपींना जेलमध्ये टाकायला हवे. हाथरसमध्येच नाही तर देशभरात अशा घटना घडत असल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केलं आहे. तर समाजात बदल घडवायचं असेल तर, देशात आई-बहिनींसोबत जे सुरू आहे ते अन्याय आहे. हाथरस प्रकरणात सरकार कुटुंबियांची मदत करण्याच्या ऐवजी आरोपींची मदत करत आहे. हे खुप निंदनीय आहे असे राहुल गांधी म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies