भारताचे पाकिस्तानाला सनसनीत उत्तर, काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह यांनी जनिव्हा येथील यूएनएचआरसी येथे जम्मू-काश्मीरवरील पाकिस्तानच्या लबाडीचा पर्दाफाश केला

नवी दिल्ली । संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानच्या चुकीच्या आरोपाला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, भारत म्हणाला की काश्मीर हा आपला अंतर्गत प्रश्न आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह यांनी जनिव्हा येथील यूएनएचआरसी येथे जम्मू-काश्मीरवरील पाकिस्तानच्या लबाडीचा पर्दाफाश केला.

ते म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार खोऱ्यात सामाजिक-आर्थिक आणि न्यायाला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या निर्णयांमुळे विकासाचा थेट लाभ जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना होणार आहे. यामुळे लैंगिक भेदभाव संपेल, बाल हक्क सुधारतील आणि शिक्षण व माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी होईल.AM News Developed by Kalavati Technologies