चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले एस. जयशंकर, म्हणाले- परस्पर मतभेद वादाचे कारण ठरू नयेत!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत.

बीजिंग । भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी सोमवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची बीजिंग येथे भेट घेतली. जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये परस्पर मतभेद असू शकतात, परंतु हे वादाचे कारण बनू नये. चीनशी व्यावसायिक, सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भारताचा जोर राहील. तत्पूर्वी, जयशंकर यांनी चिनी उपराष्ट्रपती वांग किशान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ते तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत.

यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले की, ‘‘गतवर्षी झालेल्या बैठकीत आम्ही सांस्कृतिक आदानप्रदानासाठी 10 मुद्द्यांवर चर्चा केली होती. यावेळीही याच मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. आम्ही 100 विविध उपक्रमांच्या माध्यमातून याला चालना देणार आहोत. येणाऱ्या काही महिन्यांत म्युझियम मॅनेजमेंट, थिंक टँक आणि एज्युकेशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांस्कृतिक आदानप्रदानावर जोर देऊ. यासोबतच व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी नव्या संधींचा शोध घेत आहोत. आम्ही आरोग्य क्षेत्रात पारंपरिक औषधांच्या प्रचार आणि आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकारांसाठी प्लेयर एक्ऱ्चेंज प्रोग्रामसहित 4 एमओयूंवर स्वाक्षरी केली आहे."AM News Developed by Kalavati Technologies