देशात एका दिवसात 6 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 148 जणांचा मृत्यू, एकूण संख्या 1 लाख 18 हजार पार

आतापर्यंत 48 हजार 534 लोकांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा हा एक लाख 18 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाकडून याविषयी माहिती देण्यात आली. आता एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 झाली आहे. यामधून 3583 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 48 हजार 534 लोक बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांच्या आत 6088 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 148 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा रोज 5 हजारांनी वाढत आहे. बुधवारीही 5611 नवीन रुग्ण समोर आले होते. तर गुरुवारीही 5609 नवीन कोरोना रुग्ण समोर आले. आता देशात 66 हजार 330 नवीन केस अॅक्टिव्ह आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त 41 हजार 642 प्रकरण आहेत. 24 तासात येथे 2345 नवीन केस समोर आले आहेत. गुजरातमध्ये एकूण 12 हजार 910 प्रकरण समोर आले आहेत. येथे 24 तासात 371 प्रकरण समोर आले आहेत. तर तामिळनाडूमध्ये गुजरातपेक्षा जास्त एकूण 13 हजार 967 केस समोर आल्या आहेत. येथे 24 तासात 776 नवीन प्रकरण समोर आले आहेत.

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 659 एवढा आहे. आतापर्यंत येथे 194 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5567 लोक बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 6227 एवढा आहे. येथे आतापर्यंत 151 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 5981 झाली आहे. यामधील 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies