बापरे! देशात गेल्या 24 तासांत 47 हजार 704 रुग्णांची नोंद, 654 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रिय रुग्ण आहेत.

नवी दिल्ली | भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता 14 लाख 83 हजार 156 झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 47 हजार 704 नवीन रुग्ण आढळून आले. तर, एकाच दिवसात 654 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 33 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 9 लाख 52 हजार 743 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळं देशाचा रिकव्हरी रेट 64.23% झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे सर्वात जास्त सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 80 हजारांच्या पार गेली आहे. सद्यस्थितीला महाराष्ट्रात एक लाख 40 हजारहून अधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो. या पाच राज्यांसह जगभरातील एकूण देशांच्या तुलेनत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो.AM News Developed by Kalavati Technologies