मध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यात विषारी दारूने घेतला 11 जणांना बळी

मुरैना जिल्ह्यात काल रात्री विषारू दारू पिल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर आहे

मुरैना । मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर असून, त्यांच्यावर ग्वालियर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी रात्री मुरैना जिल्ह्यातील दोन गावात विषारी दारू आढळून आली. त्या दारूचं सेवन केल्याने मानपुरातील 7 तर पहाबली गावातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका जणाचा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

पोलीसांनी बागचीनी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मध्य प्रदेशात विषारी दारूची घटना नवीन नसून, लॉकडाऊनच्या काळ्यातही विषारी दारूने 8 जणांचा जीव घेतला होता.AM News Developed by Kalavati Technologies