उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये दुचाकीस्वारावर हल्ला, दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

युपीतील आझमगढमध्ये दुचाकीस्वारावर हल्ला करण्यात आला असून, यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

आझमगढ । उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात आज दुचाकीवर असलेल्या तीन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. हेरगिरीच्या कारणावर ही घटना झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. निजामाबाद जिल्ह्यातील हुसैनाबाद गावातील अशरफ नावाचा तरुण आपल्या दोन मित्रांसोबत संपुर्ण गावाला दोन-तीनदा चक्करा मारत होता. त्यादरम्यान गावातील एका तरुणाने आपल्या जोडीदारांच्या मदतीने गावाला चक्करा मारणाऱ्या तरुणांवर चाकूने हल्ला केला.

दरम्यान, हल्ला झाल्यानंतर तिघेही तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. त्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यात असमर आणि काजिमचा मृत्यू झाला असून, मुशीर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies