मी मोदी आणि अमित शहांना आमचे नेते मानायचो, पण 'या' निर्णयानंतर मी त्यांची पूजा करू लागलो - शिवराज

मी मोदी आणि अमित शहांना आमचे नेते मानायचो, पण 'या' निर्णयानंतर मी त्यांची पूजा करू लागलो - शिवराज

भोपाळ । जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे, असं मत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. या निर्णयानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूजा करायला लागलो, असंही ते म्हणाले.

शिवराज सिंह यांनी रविवारी कलम 370 संदर्भात प्रतिक्रिया देताना, माजी पंतप्रधन पंडित जवाहरलाल नेहरू यांना गुन्हेगार संबोधलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सोमवारी शिवराज सिंह यांनी पुन्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मी तथ्य समोर ठेवले होते आणि जबाबदारीने वक्तव्य केलं होतं. जम्मू-काश्मीरबाबत नेहरू यांनी जी चूक केली होती ती पंतप्रधन मोदींनी सुधरली आहे, असं त्यांनी सांगितलं. मोदींनी कलम 370 रद्द करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. याआधी मी मोदी आणि अमित शहांना आमचे नेते मानायचो, पण या निर्णयानंतर मी त्यांची पूजा करू लागलो आहे, असं ते म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies