'जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला पण जाळा'

अशी संतप्त प्रतिक्रिया एका आरोपीच्या आईने दिली

हैदराबाद ।  डॉक्टर महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला असून, प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, त्यातील एक उपनिरीक्षक आणि दोन हवालदार आहेत. त्याचबरोबर या प्रकरणातील चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या घटनेने फक्त तेलंगणातच नाही तर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना भर रस्त्यात फाशीची शिषा द्या अशी मागणी केली जात आहे. चार आरोपींपैकी एक आरोपी चेन्नाकेशवुलूची आई जयम्माने मीडियाला सांगितले की, 'जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला पण जाळा. माझा मुलगा माझा नाही. चूक ही चूकच आहे त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी.' अशी संतप्त प्रतिक्रिया एका आरोपीच्या आईने दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies