बलात्कार करणाऱ्यांना महिनाभरात फासावर लटकवा - नुसरत जहा

गुन्हा सिद्ध झाल्यास बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर लटकावा असा सल्ला त्यांनी दिला आहे

नवी दिल्ली ।  हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण आणि उन्नावमधील बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याच्या घटनेमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे. दिवसेंदिवस महिलांसोबत घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनांनंतर सर्वसामान्यांपासून राजकीय क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनीदेखील या घटनांवर कठोर शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर लटकावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

ट्विट करत नुसरत जहा यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘नाही म्हणजे नाहीच. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी जबाबदारीने वागायला हवं. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा’ असं ट्विट नुसरतने यांनी केलं



AM News Developed by Kalavati Technologies