हैदराबादमधील घटनेनंतर छत्तीसगडमधील बलरामपूरमध्ये आढळला महिलेचा अर्धा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

अद्याप महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही

छत्तीसगढ । तेलंगणमधील हैदराबादनंतर आता छत्तीसगडमधील बलरामपूरमध्ये एका महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला आहे. बारापूरच्या राजपूरच्या मुरका गावात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. या संदर्भात बलरामपूरच्या एसपी टीआर कोशिमा यांचे म्हणणे आहे की, अद्याप महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोस्टमॉर्टम अहवालही लवकरच समोर येईल. हे प्रकरण बलात्काराचे आहे की नाही हे समजू शकले नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाहेरून आणून येथे सोडण्यात आल्याची शंका व्यक्त केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

यापूर्वी बुधवारी बलात्कारानंतर तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पशुवैद्य प्रियंका रेड्डीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींनाही अटक केली आहे. या घटनेबद्दल देशभरात संताप आहे आणि लोक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तीव्र झाला असून आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी लोकांची मागणी आहे.AM News Developed by Kalavati Technologies