भारताला अंतराळात पोहोचवणाऱ्या विक्रम साराभाईंची 100 वी जयंती, गुगलने केले खास डूडल

विक्रम साराभाईचे डूडल मुंबईचे कलाकार पवन राजुरकर यांनी बनवले आहे.

एएम न्यूज | आज गूगलने आपले डूडल भारतीय वैज्ञानिक विक्रम भाई साराभाईंना समर्पित केले आहे. विक्रम साराभाई यांची आज100 वी जयंती आहे. भारताने अंतराळाळ विज्ञानात प्रगती करत मोठे मोठे अभियान यशस्वी केले होते. याचे सर्व श्रेय फक्त महान वैज्ञानिक विक्रम साराभाई यांनी जाते. विक्रम साराभाईचे डूडल मुंबईचे कलाकार पवन राजुरकर यांनी बनवले आहे.

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबादमध्ये 12 ऑगस्ट 1919 मध्ये झाला होता. त्याचे वडील अंबालाल साराभाई एक यशस्वी उद्योगपती होते. तसेच गुजरातमध्ये त्यांचे अनेक उद्योग होते. साराभाईंनी 'केम्ब्रिज महाविद्यालय'तील सेंट जॉन कॉलेजमधून डॉक्टरेट डिग्री घेतली होती. साराभाई हे नेहमी तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन द्यायचे. साराभाईंनी 1947 मध्ये अहमदाबादमध्ये भौकित संशोधन प्रयोगशालेची स्थापना केली होती. त्यांना 1962 मध्ये शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 1966 मध्ये पद्म भूषण आणि 1972 मध्ये पद्म विभूषण (मरणोत्तर)ने सन्मान करण्यात आले होते.

कशी झाली इस्रोची स्थापना
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ची स्थापना विक्रम साराभाईंच्या महान कार्यापैकी एक आहे. रुसी स्पुतनिक लॉन्च झाल्यानंतर त्यांनी भारतासारख्या विकसनशील देशासाठी अंतराळ संस्थेचे महत्त्व किती आहे हे सरकारला पटवून दिले आणि इस्रोची स्थापना केली. यासोबतच त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली आहे. 'परमाणु ऊर्जा आयोग'च्या अध्यक्षपदीही ते राहिले होते. त्यांनी अहमदाबादमधील इतर उद्योपतींसोबत मिळून 'इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट', अहमदाबाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.

विक्रम साराभाई यांनी खालील संस्था स्थापन केल्या
- भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा (पीआरएल), अहमदाबाद
- इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आईआईएम), अहमदाबाद
- कम्यूनिटी सायन्स सेंटर, अहमदाबाद
- दर्पण अकाडेमी फॉर परफार्मिंग आर्ट्स, अहमदाबाद
- विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुवनंतपुरम
- स्पेस अॅप्लीकेशन सेंटर, अहमदाबाद
- फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टर (एफबीटीआर), कल्पकम
- व्हेरिएबल एनर्जी साइक्लोट्रॉन प्रॉजेक्ट, कोलकाता
- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(ईसीआईएल), हैदराबाद
- यूरेनियम कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (यूसीआईएल), जादूगुडा, बिहार
अंतराळाच्या जगामध्ये भारताला पोहोचवणाऱ्या महान वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांचा मृत्यू 30 डिसेंबर, 1971 रोजी कोवलम, तुरुवनंतपुरम, केरळमध्ये झाला होता.AM News Developed by Kalavati Technologies