आनंदाची बातमी! देशांतर्गत वापरासाठी सीरमच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचे 3 कंटेनर अखेर रवाना

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटचे कोव्हिशिल्ड या लसीचे 6 कंटेनर देशातील विविध भागात रवाना करण्यात आले आहे

पुणे । देशात नववर्षाला कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक बातमी आल्यानंतर अखेर 'कोव्हिशिल्ड' या लसीचे पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया येथून वितरण सुरू झाले आहे. पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लसीचे 6 कोल्ड स्टोरेज कंटेनर रवाना करण्यात आले. पुणे विमानतळावरून ही लस देशातील 13 शहारांमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यात अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

पुणे विमानतळावरून दिल्लासाठी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला विमान आज सकाळी 8 वाजता रवाना करण्यात आले. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे. पहिल्या टप्प्यात , या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्स यांच्यासाठी होणार आहे. सीरमला सुरूवातीला 2 कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 65 लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड ही लस 2 ते 8 अंश तापमानात ठेवणे आवश्यक असून, कंपनीने त्यासाठी कोल्ड स्टोरेज कंटेनरची व्यवस्था केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies