Glacier Burst : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर, 125 हून अधिक जण बेपत्ता

उत्तराखंडच्या जोशीमठ येथे रविवारी हिमकडा कोसळल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

नवी दिल्ली । उत्तराखंडच्या जोशीमठ येथे मोठी दुर्घटना घडली असून, मठ परिसरात हिमकडा कोसळल्यानंतर बचावकार्य वेगाने सुरु आहे. या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर आतापर्यंत आठ जणांचा मृत्यदेह आढळलेला आहे. तर 125 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. सेना, वायुसेना, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफने बचावकार्यास रात्रीच सुरुवात केली आहे. हिमकडा कोसळल्यानं धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरातील पाच पूल वाहून गेले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृत कुटुंबियांना 02 लाखांची मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. 'उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या महापूरामध्ये जलविद्युत प्रकल्पातील दीडशेहून अधिक कर्मचारी वाहून गेले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या नैसर्गिक आपत्तीत संपुर्ण देश उत्तराखंडच्या पाठीशी आहे.' असे मोदी म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies