मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन

काही दिवसांपुर्वी रघुवंश प्रसाद यांना कोरोनाची लागण झाली होती

नवी दिल्ली । माजी केंद्रिय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह याचं आज निधन झालं आहे. त्यांनी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ते निकटवर्तीय होते. राजकारणात त्यांची रघुवंश बाबू म्हणून ओळख होती. काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तीन दिवसांपुर्वी त्यांनी लालू प्रसाद यादव यांना पत्र पाठवून राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा दिला होता. मात्र आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केला नव्हता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रघुवंश प्रसाद यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वासोच्छवासचा अडथळा जानवत होता.AM News Developed by Kalavati Technologies