माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मुलासह नजरकैदेत, विरोधात सुरू केले उपोषण

आंध्र प्रदेशात झालेल्या टीडीपी नेत्याच्या हत्येविरुद्ध चंद्राबाबू नायडू आज निदर्शने करणार होते.

हैदराबाद । तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) चे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशात झालेल्या टीडीपी नेत्याच्या हत्येविरुद्ध चंद्राबाबू नायडू आज निदर्शने करणार होते. पोलिसांनी नायडू आणि त्यांच्या मुलाला घराबाहेर पडू दिले नाही. दोघांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

याविरुद्ध चंद्राबाबू नायडूंनी आपल्या घरीच आज सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत उपोषणाची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर टीडीपी समर्थक त्यांच्या घरी जात होते, त्यांनाही पोलिसांनी रोखले. अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण स्थिती असून पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे.AM News Developed by Kalavati Technologies