अमेझॉन-फ्लिपकार्टची छप्परफाड कमाई, सहा दिवसात 19000 कोटींची विक्री

बेंगळुरूची रिसर्च कंपनी रेडसीर कंसल्टंसीने याची आकडेवारी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली | सणासुदीच्या काळात लोक शॉपिंगच्या मूडमध्ये आहेत. याचाच फायदा अमेझॉन-फ्लिपकार्टला झाला आहे. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळांवर विशेष सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिग्गज ई-टेलर्स Amazon आणि Flipkart ने अवघ्या सहा दिवसांच्या आत 19,000 कोटींची विक्री केली आहे. 29 सप्टेंबरपासून चार अक्टोबरच्या काळात एवढी कमाई जाली आहे. हा आकडा मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये समोर आला आहे.

बेंगळुरूची रिसर्च कंपनी रेडसीर कंसल्टंसीने याची आकडेवारी जाहीर केली आहे. सेल दरम्यानच्या सहा दिवसांच्या विक्रीमध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनची भागीदारी तब्बल 90 टक्के होती. यामध्ये सर्वात जास्त वाटा मोबाइल विक्रीचा होता. विक्री झालेल्या सामानांमध्ये 55 टक्के विक्री मोबाइलच्या श्रेणीतून झाल्याचे वृत्त आहे. सणासुदीच्या काळातील पहिल्या टप्प्यातील सेलमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑक्टोबर महिन्यात फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या ऑनलाइन विक्रीचा आकडा 39 हजार कोटी रुपये होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याविषयी बोलताना रेडसीर कंसल्टिंगचे संस्थापक आणि सीईओ अनिल कुमार म्हणाले की, 'आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीमध्येही सणासुदीच्या सेलमधील पहिल्या टप्प्यात विक्रमी तीन अब्ज डॉलरच्या सामानाची विक्री झाली आहे. यामधून ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात येतो. तसंच ऑनलाइन खरेदीला ग्राहकांची पसंती असल्याचे हे संकेत आहेत' असे ते म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies