Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा आज 76 वा दिवस, राकेश टिकैत आज कुरुक्षेत्रात घेणार 'महापंचायत'

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचे दिल्लीतील विविध सीमांवर गेल्या 75 दिवसांपासून आंदोलन सुरुच आहे.

नवी दिल्ली । शेतकरी आंदोलनाचा आज 76 वा दिवस आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, कृषी कायदे वापस घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. सरकार कृषी कायद्यांना दीड वर्षासाठी स्थगित करण्यास तयार असून, शेतकरी मात्र निर्णयाचा विरोध करत आहे. केंद्र सरकार कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार, मात्र हे नवीन कृषी कायदे वापस घेतले जाणार नाही. असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत 11 वेळा बैठकी झाल्या असून, त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना बैठकीतून काही तोडगा काढू अशी विनंती केली. त्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा आता सरकारसोबत चर्चा करणार आहे. बैठकीसाठी तारीख आणि वेळ केंद्र सरकारने ठरवावं. असे शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत पंतप्रधानांनी केलेल्या MSP च्या आश्वासनानंतर शेतकरी बैठक घेण्यास तयार झाले आहे.

दरम्यान आज शेतकरी नेते राकेश टिकैत हरियाणातील कुरुक्षेत्रामध्ये किसान पंचायत घेणार आहे. याआधी रविवारी त्यांनी चरखी दादरीत किसान महापंचायत सभेला संबोधित केलं होतं. त्यात टिकैत म्हणाले होते की, 'केंद्र हे विवादास्पद कृषी कायद्यांना मागे घ्यावे. MSP साठी त्यांना आणखी एक कायदा तयार केला पाहिजे. आणि अटक केलेल्या शेतकऱ्यांना तुरुंगातून सोडलं पाहिजे.' असे टिकैत म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies