जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून वंचितांसाठी अनेक कामं केली - अमित शाह

आजपासून पाच वर्षांपूर्वी मी दसऱ्यालाच भगवान गडावर आलो होतो - अमित शाह

मुंबई । बीड जिल्ह्यातील सावरगावच्या भगवान भक्तीगडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याबद्दल भगवान गडावर अमित शहा यांना 370 तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 370 तिरंग्या झेंड्यांनी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय सभास्थळी एक लाख भगवे झेंडे लावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या मेळाव्यासाठी अमित शहा औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असून ते बीडकडे रवाना झाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भगवान गडावर मेळावा होत असून निवडणुकीचे निमित्त साधून अमित शहा त्यासाठी आले आहेत. भाजपची ही पहिलीच प्रचार सभा असून त्यात  शहांनी प्रचाराचा नारळ फोडला. 

अमित शहा म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी दसऱ्यादिवशीच मी भगवानगडावर आलो होतो. आता पुन्हा भगवानबाबाच्या दर्शनाला आलो आहे. भगवानबाबांनी वंचितांसाठी संघर्ष केला. शिक्षणाचा विचार लोकांमध्ये रुचविला. ओबीसी, वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. मराठवाड्याला खूप प्रेरणा मिळाली आहे. भगवानबाबांचे स्मारक प्रत्येकाला प्रेरणा देत राहील. पंकजाताईंनी हे भव्य स्मारक उभारले आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटविल्याबद्दल अमित शहा म्हणाले, की आम्हाला 300 जागा मिळवून दिल्यानंतर आम्ही कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला. काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम मोदींनी केले आहे. 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोष्टी मोदी सरकारने केल्या. सर्व भगवानभक्तांनी मोदींनी हटविलेल्या कलम 370 निर्णयाची माहिती द्यावी. ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies