धक्कादायक...! कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह थेट जेसीबीच्या सहाय्याने पोहचवला स्मशानभूमीत

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

हैदराबाद | आंध्र प्रदेशात, 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं, या वृद्धाचा मृतदेह थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने स्मशानभूमीत नेण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या घटनेनंतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांचे डोर-टू-डोर आरोग्य सर्वेक्षण दरम्यान महानगरपालिकेचा माजी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर या माजी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र उपचार सुरू असतांना या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं त्याचा मृतदेह थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने स्मशानभूमीत नेण्यात आला. दरम्यान या प्रकरणावरून आंध्र प्रदेश सरकारवर सगळीकडून टीकेचा भडिमार होत आहे. सरकारने या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले असून दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies