धक्कादायक ! नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू, अन् तब्बल 95 वऱ्हाडी मंडळी पॉझिटिव्ह

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अचानक नवरदेवाचा कोरोनामुळं मृत्यू झाला त्यानंतर लग्नसमारंभात हजर असलेल्या 95 वऱ्हाडीमंडळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने भारतात मोठं थैमान घातलं आहे. अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. अशातच बिहारची राजधानी पटनामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी अचानक नवरदेवाचा कोरोनामुळं मृत्यू झाला त्यानंतर लग्नसमारंभात हजर असलेल्या 95 वऱ्हाडीमंडळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, तीस वर्षीय नवरदेव गुरुग्राममध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करायचा आणि 12 मे रोजी लग्नासाठी तो आपल्या गावी देहपालीला आला होता. यावेळी, त्याच्यामध्ये कोविड19 ची लक्षणे आढळून आली, परंतु कुटुंबीयांनी तपासणी न करता त्याचे लग्न केले. तसेच लग्नसमारंभात फक्त 50 लोकांना हजर राहण्याची परवानगी असतांना शेकडो लोकांनी या समारंभात हजेरी लावली. मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यानंतर अचानक दुसऱ्याच दिवशी नवऱ्या मुलाची प्रकृती बिघडली त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच आरोग्य प्रशासनाने नवरदेव-नवऱ्या मुलीच्या कुटुंबियांची तसेच लग्नसमारंभात हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळीची कोरोना तपासणी केली असता यामध्ये जवळपास 95 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरील घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाकडून परिसर सील करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies