सरकारची घोषणा - प्रत्येक कोरोना वॉरिअर्सला मिळणार 50 लाखांचा विमा

20 लाख मेडिकल स्टाफ आणि कोरोना वॉरिअर्सला मिळणार फायदा

नवी दिल्ली | सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. दरम्यान मोदी सरकारने गरीबांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 1 लाख 70 हजार कोटींच्या आर्शित पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना वॉरिअर्ससाठी 50 लाख रुपयांचे मेडिकल इंश्योरेंसची घोषणाही सरकारने केली आहे.

आरोग्यमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, कोरोनाच्या युद्धाचा सामना करणाऱ्या आशा कार्यकर्त्या, स्वच्छता कर्मचारी, मेडिकल आणि पॅरा-मेडिकल स्टाफसाठी 50 लाख रुपयांचा वीमा कव्हरची घोषणा करण्यात आली. याचा फायदा 20 लाख मेडिकल स्टाफ आणि कोरोना वॉरिअर्सला मिळणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies