देशातील कोरोना रुग्णांची संख्या 603 वर

तामिळनाडूमध्ये कोरोनाचे आणखी तीन रुग्ण

नवी दिल्ली | तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूची आणखी तीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या येथे वाढून 23 झाली आहे. त्याच वेळी, देशात कोरोना रूग्णांची संख्या 603 झाली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता पुन्हा नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगलीच्या इस्लामपूरमधील 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर सांगली इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण झाली आहे.

पाटण्यातील आयजीआयएमएसमध्ये कोरोना विषाणूची चाचणी सुरू झाली आहे. हे बिहारमधील दुसरे केंद्र आहे, जिथे कोरोना चाचणी सुरू झाली आहे. पूर्वी ही सुविधा केवळ राजेंद्र मेमोरियल रिसर्चमध्ये उपलब्ध होती. बिहार सरकारचे प्रधान सचिव संजय कुमार म्हणाले की लवकरच ही सुविधा पाटण्यातील पीएमसीएच आणि दरभंगाच्या डीएमसीएचमध्ये उपलब्ध होईल.AM News Developed by Kalavati Technologies