Corona In India: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 लाखांच्या पार, तर आतापर्यंत 1,10,586 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,26,509 जणांवर उपचार सुरू असून, गेल्या 24 तासात पुन्हा 63,509 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून, कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 72 लाख जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 63 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 63 हजार 509 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 730 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 72 लाख 39 हजार 390 एवढा झाला आहे. सध्या देशात 8 लाख 26 हजार 729 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे 1 लाख 10 हजार 586 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 63 लाख 1 हजार 928 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाने जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला असून, कोरोनामुळे जगभरात सुमारे 3 कोटी 77 लाख जणांना ग्रासलं आहे. तर सुमारे 10 लाख 79 हजार जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासायक म्हणजे आतापर्यंत 2 कोटी 62 लाख जण कोरोनामुक्त झाले आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies