Corona In India: देशात गेल्या 24 तासात 62,212 जणांना कोरोनाची लागण, तर 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,95,087 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनारुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढत असून, ही एक दिलासादायक बाब आहे. जरी देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 74 लाख जणांना ग्रासलं आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 65 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 62 हजार 212 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 74 लाख 32 हजार 681 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 95 हजार 87 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 12 हजार 998 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत सुमारे 65 लाख 24 हजार 596 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: