Corona In India : देशात गेल्या 24 तासात 61,871 कोरोनाबाधितांची भर, तर 1033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,83,311 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनारुग्ण सक्रिय होण्याच्या प्रमाणात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज देशात 61 हजार 871 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना या भयावह विषाणूने देशभरात सुमारे 74 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 65 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 61 हजार 871 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 33 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 74 लाख 95 हजार 522 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 7 लाख 83 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 14 हजार 31 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 65 लाख 97 हजार 210 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies