Corona In India: देशात गेल्या 24 तासात 92 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 48 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 92 हजार 71 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्नं झालं आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर लगातार सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता भारतीयांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या महिन्याभरापासून देशात रोजच कोरोनाचा विक्रमी रेकॉर्ड होत आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 48 लाख लोकांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आत्तापर्यंत सुमारे 80 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 38 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 92 हजार 71 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 1 हजार 136 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 48 लाख 46 हजार 428 एवढा झाला आहे. तर आत्तापर्यंत सुमारे 79 हजार 722 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे, 37 लाख 820 हजार 108 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना या भयावह विषाणूनं जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. जगभरात सुमारे 2 कोटी 86 लाख जणांना कोरोनानं ग्रासलं आहे. तर सुमारे 9 लाख 20 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 1 कोटी 94 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगभरातील कोरोनाच्या आकडेवारीचा जर विचार केला तर, अमेरिका अव्वल क्रमाकांवर असून, त्यापाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies