कोरोनामुळे भारतात 14 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 629 वर

कोरोना व्हायरसमुळे काश्मीरमध्ये पहिला मृत्यू झाला.

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढताना दिसत आहे. कोरोनाचा धोका टळावा यासाठी 21 दिवसांसाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. आज लॉकडाउनचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आता भारतातील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. तर देशभरात आता 629 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

कोरोना व्हायरसमुळे काश्मीरमध्ये पहिला मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. श्रीनगरच्या सीडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आला होते. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसचे 629 प्रकरण समोर आले आहेत. यासोबतच या व्यक्तीच्या संपर्कात येणारे 4 लोकही पॉझिटिव्ह आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies