काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी अमेरिकेला रवाना

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी अमेरिकेला गेल्या आहेत त्यामुळे पावसाळी अधिवेशनात त्यांची उपस्थिती नसणार आहे

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत. त्याच्या सोबत पुत्र राहुल गांधी सुद्धा गेले आहेत. रूटीन चेकअपसाठी सोनिया गांधी अमेरिकेला गेल्या आहेत. शनिवारी सकाळी त्या भारतातून अमेरिकेसाठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशात सोनिया गांधींची उपस्थिती नसणार आहे. त्याबाबत राहुल यांनी लोकसभा अध्यक्षांना माहिती दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी या संबधी माहिती दिली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी पुढील दोन आठवड्यानंतर भारतात परत येणार आहे. रूटीन चेकअपसाठी 30 ऑगस्ट रोजी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातून सोनिया गांधींना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 2 सप्टेंबर रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, येत्या सोमवारपासून संसद भवनात पावसाळी अधिवेशनाची सुरूवात होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies