कॉंंग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज - ज्योतिरादित्य सिंधिया

महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये मतभेद सुरू झाले आहेत

भोपाळ ।महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संदर्भात पक्षात बंडखोरी समोर येत आहेत. राहुल गांधींबद्दल सलमान खुर्शीद यांच्या विधानावर कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की मी इतर कोणत्याही विधानावर भाष्य करणार नाही, पण कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे हे खरे आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्याबद्दल सलमान खुर्शीद म्हणाले होते की, आमचे नेते राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडल्यामुळे पक्षाचे भविष्य अंधकारमय झाले आहे. कॉंग्रेसच्या या स्थितीत  आपले भविष्य ठरवू शकत नाही. यासह ते म्हणाले की आमची सर्वात मोठी समस्या ही आहे की आमचे नेते (राहुल गांधी) यांनी अध्यक्षपद सोडले आहे.AM News Developed by Kalavati Technologies