दिलासादायक! देशात आतापर्यंत 64 लाख जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त

देशात गेल्या 24 तासात 63,371 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 73 लाखांच्या पार गेला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून, आतापर्यंत सुमारे 64 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 8 लाख जणांवर उपचार सुरू आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 73 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 63 हजार 371 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 895 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 73 लाख 70 हजार 469 एवढा झाला आहे.

सध्या देशात 8 लाख 4 हजार 528 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 12 हजार 161 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 64 लाख 53 हजार 780 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, गेल्या 24 तासात 70 हजार 338 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रिकव्हरी रेट हा 87.56 टक्के झाला आहे. तर कोरोनाचा एक्टिव रेट मध्ये घसरण झाली असून, सध्या रुग्ण सक्रिय होण्याचा दर 10.92 टक्के झाला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू दर 1.52 टक्के इतका आहे.AM News Developed by Kalavati Technologies