जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी, श्रीनगरमध्ये ट्रान्सपोर्ट आणि टेलीफोन सेवा ठप्प

काश्मीर घाटात 3 महिन्यांनंतर 11 नोव्हेंबरपासून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरात वातावरण बदलले आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलगर्गमध्ये चारही बाजूंनी बर्फाची चादर पाहायला मिळतेय. पर्वतांवरही बर्फांची चादर पाहायला मिळतेय. याच काळात श्रीनगरमध्ये खराब वातावरणामुळे हायवे जाम झाला आहे. प्रचंड बर्फवृष्टीमुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क तुटला आहे. श्रीनगरच्या अनेक परिसरातमध्ये बर्फवृष्टीमुळे टेलीफोन लाइनही बंद झाल्या आहेत.

तर हिमाचल प्रदेशात सकाळपासून कुल्लू जिल्ह्यातील सोलांगमध्ये बर्फवृष्टी होत आहे. तर उत्तराखंडमध्ये वातावरण बिघडले आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टी आणि पाऊस पडतोय. उत्तरकाशीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय.

काश्मीर घाटात 3 महिन्यांनंतर 11 नोव्हेंबरपासून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम होऊ शकतो. 5 ऑगस्टला केंद्र सरकारकडून कलम 370 हटवल्यानंतर बनिहाल-बारामूला रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली होती.

रेल्वे विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू केली जात आहे. कश्मीरच्या डीव्हिजनल कमिश्न बसीर अहमद खान यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना या संबंधीत निर्देश दिले आहेत. 3 दिवसांच्या आत रेल्वे ट्रॅकची पूर्ण तपासणी करण्यात येईल. तसेच 10 नोव्हेंबरला एक ट्रायल ट्रेन चालवण्यात येणार आहे. नंतर 11 नोव्हेंबरला पुन्हा अशीच ट्रेन चालवून पाहिली जाणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies