ब्राझीलमध्ये कोरोनाचा विळखा, 24 तासात एक हजार जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर, जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीचा अहवाल

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा कहर ब्राझीलमध्येही पहायला मिळतोय. ब्राझीलमध्ये तीन लाख तीस हजार आठशे नव्वद जण कोरोनाबाधित आहेत. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती समोर आलीय. तर जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीने जारी केलेल्या अहवालानुसार कोरनाबाधितांमध्ये ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 45 हजार झालीय. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात एक हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्यामुळे आत्तापर्यंत तिथे मृतांची संख्या एकवीस हजार झालीय.AM News Developed by Kalavati Technologies