गटारी आणि शौचलयं स्वच्छ करण्यासाठी खासदार झालेले नाही - साध्वी प्रज्ञा

त्यांच्या या वक्तव्यांनंतर संताप व्यक्त होताना दिसतो आहे.

नवी दिल्ली | भोपळच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या अशाच एका वक्तव्यामुळे वादात सापडल्या आहेत. गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाले नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी साध्वी प्रज्ञावर टीका केली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ही भाजपच्या खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाची त्यांच्याच खासदाराकडून खिल्ली उडवली जात असल्याच्या चर्चा रायकीय वर्तुळांत रंगू लागल्या आहेत. मध्य प्रदेशातील सिहोर येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आम्ही गटारं आणि शौचालयं साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्यासाठी आम्हाला खासदार म्हणून जनतेनं निवडून दिलं आहे, ते काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. मात्र त्यांच्या या वक्तव्यांनंतर संताप व्यक्त होताना दिसतो आहे.AM News Developed by Kalavati Technologies