बँकिंग फ्रॉडपासून सावध रहा अन्यथा..; SBI ने ग्राहकांना दिला 'हा' ईशारा

सायबर गुन्हेगारीची प्रकरणे वाढत असल्याने देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीयाने ग्राहकांना एसएमएस पाठवून बँकिंग फ्रॉडपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली | देशामध्ये ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सायबर गुन्हेगारीची प्रकरणे वाढत असल्याने देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीयाने ग्राहकांना एसएमएस पाठवून बँकिंग फ्रॉडपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना काळापासून देशात ऑनलाईन फसवणूक आणि गुन्हेगारीची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. घोटाळे टाळण्यासाठी बँक आणि सरकार वेळोवेळी अॅलर्ट जारी करत आहे. एसबीआयने मेसेजद्वारे 40 कोटींहून अधिक ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. डेबिट किंवा एटीएम कार्ड सुरुक्षित पध्दतीने वापरणे आणि एटीएममधून व्यवहार करताना काळजी घेण्याची निर्देश दिेले आहे. एटीएम किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना मोबाईल फोन अनलॉक न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड सुरक्षित पध्दतीने वापरणे आणि एटीएमधून व्यवहार करताना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. एटीएम किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना मोबाईल फोन अनलॉक न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अनोळी आणि पासवर्ड नसलेल्या नेटवर्कशी मोबाईल फोन कनेक्ट न करण्याच सल्ला देण्यात आला आहे. एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, जर कोणत्याही या प्रकारच्या फसवणूकीचे ते शिकार झाले तर ते सरकारच्या नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करावे.AM News Developed by Kalavati Technologies