मोठी बातमी ! पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध लाँच, 7 दिवसात होणार रुग्ण बरे

बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये 'कोरोनिल' औषध लाँच केलं आहे.

नवी दिल्ली | संपुर्ण जगात हाहाकार घालणाऱ्या कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी जगातील अनेक बड्या कंपन्यांनी त्यावर लस शोधण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र अद्यापही कोरोनावर लस सापडली नाहीये. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली मार्फत कोरोनावरचं औषध लॉंच करण्यात आलं आहे. सोमवारी बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये 'कोरोनिल' औषध लाँच केलं आहे. आम्ही या औषधाच्या दोन चाचण्या केल्या आहे.

प्रथम- क्लिनिकल चाचणी, द्वितीय- क्लिनिकल चाचणी करण्यात आल्याचं बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.

“संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. कोरोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीं आम्ही करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असं मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केलं. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत 69 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर 7 दिवसांमध्ये 100 टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी 280 जणांवर करण्यात आली,” असं बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीच्या एका टीम मार्फत औषध शोधण्याचं काम सुरू होतं. काही दिवसांपुर्वी बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आम्ही कोरोनावर औषध तयार केलं आहे. असा दावा केलं होता. या दाव्यानुसार पतंजली मार्फत कोरोनिल औषध लॉंच करण्यात आलं आहे. कोरोनिल नावाच्या या औषधाने रुग्ण 5 ते 14 दिवसात बरे होऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies