उत्तराखंडात जोशी मठाजवळ हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेक जण पाण्यात वाहून गेल्याची शक्यता

उत्तराखंडात जोशीमठ धरण फूटले असून, त्यात काही जण वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

नवी दिल्ली । उत्तराखंडच्या जोशीमोठ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. मठ परिसरात हिमकडा कोसळला असून, धौलीगंगा नदीवर ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, अचानक पूर परपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. तर अनेक बेपत्ता असून, हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तराखंड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपोवन रैणी भागात हिमकडा कोसळल्याने ऋषीगंगा पावर प्रोजेक्टचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अलंकनंदा नदीची पाणीपातळी सतत वाढत आहे. त्यामुळे नदीकाळच्या गावांना सुरक्षित स्थळी पोहोचले जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies