अर्णब गोस्वामी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी, खासदार प्रियंका चतुर्वेदींची मागणी

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी यासाठी शिवसेनेने मागणी केली आहे

नवी दिल्ली । यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, संसदेत कृषी कायद्यांच्या मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्यानंतर आता रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणी संसदेत हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अर्नब यांच्या व्हॉट्सअॅप चॅटप्रकरणी संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. अर्णबचे चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असून, त्यांनी सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचं प्रियंका म्हणाला. त्यामुळे आज संसदेच्या राज्यसभा सभागृहात गोस्वामी चॅट प्रकरण गाजू शकतो.

बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दास गुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात देशाच्या सुरक्षेसंदर्भात अनेक गोष्टींवर अर्नब आणि पार्थो यांनी भाष्य केले आहे. बालाकोटमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दलही त्यात संभाषण करण्यात आले होते. एका पत्रकाराला ह्या सर्व गोष्टी कशा माहिती झाल्या. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies