अल कायदाचा म्होरक्या दक्षिण आशिया प्रमुख आसिम उमरचा खात्मा

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचनालयाने (एनडीएस) ट्वीट याविषयी माहिती दिली.

नवी दिल्ली | अल कायदाचा म्होरक्या दक्षिण आशिया प्रमुख आसिम उमरचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमध्ये केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये भारताच्या मोठ्या शत्रूचा खात्मा करण्यात आला. आसिम उमर हा अल कायदा या अतिरेकी संघटनेचा दक्षिण आशिया भागातील म्होरक्या होता. अफगाणिस्तानच्या गुप्तचर विभागाकडून त्यांच्या खात्म्याचे वृत्त देण्यात आले आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालिबानमध्ये मागील महिन्यात अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त कारवाईमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये झाला होता.

अल कायदाचा नेता अयमन अल जवाहिरीने सप्टेंबर 2014 मध्ये एका व्हिडिओ संदेशच्या माध्यमातून भारत, म्यांमार आणि बांग्लादेशात जिहादसाठी एक्यूआइएसची स्थापना केली होती. तेव्हापासून असिम उमर याचा प्रमुख होता. अफगानिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा निर्देशायलने सांगितले की, 23 सप्टेंबरला अमेरिका-अफगानिस्तानच्या संयुक्त कारवाईत त्याचा खात्मा झाला. त्याच्यासोबत एक्यूआइएसचे सहा इतर सदस्यही मारले गेले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त पाकिस्तानी होती. खात्मा झालेल्या लोकांमध्ये अल जवाहिरीपर्यंत असिम उमरचे संदेश पोहोचवणाऱ्या रेहानचाही समावेश होता.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचनालयाने (एनडीएस) ट्वीट याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 'एनडीएसच्या माध्यमातून 23 सप्टेंबर रोजी हेलमंड प्रांतात मूसा कला जिल्ह्यामध्ये एका संयुक्त मोहिमेत एक्यूआयएसचा नेता आसिम उमर याचा मृत्यू झाला आहे. तो भारतीय उपमहाद्वीप मध्ये अल कायदाचा प्रमुख होता'.AM News Developed by Kalavati Technologies