नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

आज नोटबंदीला तीन वर्ष पूर्ण

मुंबई । 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले होते. यातच आज नोटबंदीला तीन वर्ष पूर्ण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांमध्ये सध्या नोटबंदी फेल झाल्याचे मिम्स वायरल होत आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने तीन वर्षांपूर्वी अचानकपणे केलेल्या निश्चलनीकरणाला अर्थात नोटाबंदीला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. याच निर्णयावर तेव्हापासून टीका करणाऱ्या विरोधकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा या निर्णयामुळे देशाचे कसे नुकसान झाले, याची आठवण करून दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट केले असून, त्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्याला ३ वर्षे झाली. या हल्ल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा बळी गेला, अनेक छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आणि अनेक भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या. हे सर्व ज्यांच्यामुळे घडले त्यांच्यावर अजून कायदेशीर कारवाई झालेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटसोबत त्यांनी ग्राफिक्सही जोडले आहे. ज्यामध्ये नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. यावर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता’. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला. असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. मोदी सरकारच्या नेटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies