अभिनेत्री कंगणा रणौतनं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही सुरूच असून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

मुंबई (सलमान शेख)। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ठाकरे सरकार आणि मुंबई पोलीसांवर टिका करणारी अभिनेत्री कंगना रणौत आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. आज कंगनानं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी कंगनासोबत तिची बहिण रंगोली सोबत होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने राज्यात राजकारण तापले होते. तसेच मुंबई पोलीसांवर टिका करत " बॉलीवुडच्या माफियांपेक्षा मला मुंबई पोलीसांची भीती वाटते" असे वक्तव्य कंगनानं केलं होतं. त्यानंतर 9 सप्टेंबरला कंगनाचं मुंबईतील पाली हिल येथील बेकायशीर कार्यालय मुंबई पालिकेतर्फे तोडण्यात आले होते. त्यासंबधी आज कंगनानं राज्यापालांची भेट घेतली आहे.


काय आहे प्रकरण

सुशांत सिंह प्रकरणावरून कंगना रोजच मुंबई तसेच मुंबई पोलीसांवर टिका करीत होती. मला मुंबई पोलीसांची भीती वाटते, मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर झाली आहे. असे वक्तव्य कंगना केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते की, कंगनाला मुंबईची भीती वाटत असेल तर तिने मुंबईत आपला पाय ठेवू नये. त्याचदरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते की, कंगना मुंबई आली की तिचा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कंगनाला गृहमंत्री अमित शहांकडून वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.

9 सप्टेंबरला काय झालं

'मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे कुणाची बापाची हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवा' असे कंगणाने म्हटले होते. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते. कंगना मुंबईत आल्यावर तिचा थोबाड फोडू असे वक्तव्य सुद्धा प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्यानंतर कंगनाला केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. दरम्यान 9 सप्टेंबरला मुंबई मनपाने कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर तोडकार्य केले. त्यानंतर कंगना मुंबईतील दाखल झाल्यानंतर तिने पुन्हा ट्विटर युद्ध सुरु केले. "आज मेरा घर तुटा है, कल तेरा घमंड टुटेंगा" असे कंगाने म्हटले होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्याचं एकेरी उल्लेख केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कंगनावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईतील आणखी आठ अनधिकृत बांधकामाविषयी मुंबई मनपाने नोटीस बजावल्याच्या पार्श्वभुमीवर आज कंगनानं राज्यापालांची भेट घेतल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies