आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारतींवर शाईफेक

आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर सोमवारी रायबरेलीत शाईफेक करण्यात आली.

उत्तरप्रदेश | आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर सोमवारी रायबरेलीत शाईफेक करण्यात आली. ही घटना रायबरेतीली सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये घडली. आप नेते सोमनाथ भारती जिल्ह्यातील रुग्णालयांना भेटी देणार असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. भाजप घडल्याने खळबळ उडाली. भाजप व हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी भारती यांच्यावर शाईफेक केली. दरम्यान यावेळी आमदार भारती व पोलिसांमध्ये वादही झाला. त्यानंतर त्यांना अटक करुन सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर अमेठीकडे रवाना करण्यात आले अशी माहिती सुत्रांनी दिली. आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी उत्तर प्रदेशातील रुग्णालयांबाबत वादग्रस्त विभाग केले होते त्यावरुन त्यांना पोलिसांनी अटक केली.AM News Developed by Kalavati Technologies