भंडारा घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना, मोदी सरकारकडून 2 लाखांची मदत

केंद्र सरकारकडून भंडारा घटनेतील कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे

भंडारा । भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 बालकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. तर 7 बालकांना वाचवण्यात यश आले. भंडारा येथील घटनेने संपुर्ण देश हादरला असून, मृत बालकांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची, तर जखमी झालेल्या बालकांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ही मदत पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून देण्यात आली आहे. याबद्दल राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. दरम्यान, राज्य सरकारने देखील मृत बालकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथील घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies