कोरोनाला मात देण्यासाठी 'या' देशाने बनवला 'चमत्कारिक मास्क', 99 टक्के ठरतोय प्रभावी

मास्क बनवतांना त्यात झिंक ऑक्साईडचा वापर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली | कोरोनाव्हायरसला मात देण्यासाठी आणि जीवन पुर्वपदावर आणण्यासाठी कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरात सुरू आहे. कोरोनाला जर आळा घालायचा असेल तर मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. दरम्यान इस्त्रायल कंपनीने एक असा कापड तयार केला आहे. जो वारंवार धुतल्यानंतरही 99 टक्के कोरोना विषाणूचा नाश करण्यास सक्षम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या खास कापडाने मास्क निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

एका वृत्तानुसार इस्त्रायली कंपनी सोनोव्हियाचा अँटी-व्हायरस मास्क बनवतांना त्यात झिंक ऑक्साईडचा वापर करण्यात आला आहे. यामुळे वारंवार धुतल्यानंतरही हा मास्क जीवाणू आणि विषाणूचा नाश करु शकतो असा दावा करण्यात आला आहे. यामुळं कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते.

सोनोव्हिया कंपनीच्या दाव्यानुसार शांघाय येथील मायक्रोस्पेक्ट्रम लॅब येथे घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की मास्कमध्ये वापरल्या गेलेल्या कपड्याने कोरोनो व्हायरसची लागण होण्याची शक्यता 99% पेक्षा कमी आहे. सोनोव्हियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लीट गोल्डहॅमर यांनी सांगितले की, येत्या काही आठवड्यांत हा कापड रुग्णालयांमध्ये, संरक्षक उपकरणामध्येही वापरला जाऊ शकतो. ज्यामुळे सुमारे 99% कोरोना विषाणूचा नाश होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies