काँग्रेसची चौथी यादी जाहीर, 27 उमेदवारांचे नाव निश्चित

2019 लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे.

नवी दिल्ली | 2019 लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये चार राज्यांच्या 27 लोकसभा उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. यामध्ये सात उमेदवार हे उत्तर प्रदेशातील आहे. शशी थरुर यांना पुन्हा एकदा तिरुवनंतपुरममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीमध्ये उत्तर प्रदेशमधून 7, केरळमधून 12, छत्तीसगडमधून 5, अरुणाचल प्रदेशमधून 2 आणि अंदमान निकोबारमधून 1 जणाला उमेदवारी देण्यात आली आहे.

चौथ्या यादीमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशच्या महत्त्वपूर्ण सीटांवर काँग्रेसने नाव निश्चित केले आहे. येथे पहिला टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे. गौतमबुध्दनगरमधून डॉ. अरविंद सिंह चौहान, मेरठमधून डॉ. ओम प्रकाश शर्मा, बिजनौरमधून इंदिरा भाटी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर अलीगढमधून चौधरी बिरेंद्र सिंह, घोसी येथून बालकृष्ण चौहान आणि हमीरपुरमधून प्रीतम लोधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies