कल्याण स्टेशन परिसरात बॅगमध्ये आढळला महिलेचा अर्धवट मृतदेह

मृतदेह रुक्मीणीबाई रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे.

कल्याण | कल्याण स्टेशन परिसरात एका बॅगमध्ये एका महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस संशयीत आरोपींचा शोध घेतला जात आहे. कल्याण पश्चिमेतील स्टेशनसमोर असलेल्या टॅक्सी रिक्षा स्टॅण्डला रविवारी पहाटे 5.45 वाजताच्या सुमारास एका काळ्य़ा रंगाची मोठी बॅग काही प्रवाशांच्या निदर्शनास आली. या विषयी कल्याण रेल्वे पोलीस आणि कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी ही बॅग उघडून पाहताच त्यात एका महिलेचा अर्धटव मृतदेह आढळला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या बॅगमध्ये धड नसलेले शरीर होते. मृतदेह रुक्मीणीबाई रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. कल्याण जीआरपी पोलिसांकडून तपास केला जात आहे. स्टेशन परिसरामधील सीसीटीव्हीचींही तपासणी करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन इसम कल्याण रेल्वे स्थानकातून एक काळ्य़ा रंगाची बॅग घेऊन येताना आढळले. दोन पैकी एक इसम ज्याने लाल रंगाचा शर्ट घातले होते. तो या सिसिटीव्ही समोरुन पळताना दिसत आहे.

ही व्यक्ती ती काळ्य़ा रंगाची बॅग घेऊन आला. त्याच्यासोबत अन्य एक ते दोन व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. कल्याण एसीपी अनिल पोवार अणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश लोंढे या दोघांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहे. ही महिला कोण आहे, तिची हत्या का करण्यात आली. तसेच तिचे धड कुठे आहे. यासोबतच हत्या करणारे कोण आहेत. याचाही तपास पोलीसांकडून केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies