कॉंग्रेसवर प्रियंका नाराज, ट्विट करून व्यक्त केली खंत

काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.

एएम न्यूज नेटवर्क | काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला फटका बसू शकतो हे लक्षात घेत कार्यकर्त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे प्रियंका नाराज झाल्या आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांनी आपली ही नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मथुरा या ठिकाणी आल्या होत्या त्यावेळी एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत राफेल घोटाळ्यावर बोलत असताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रियंका यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे आढळून आले होते.

https://twitter.com/priyankac19/status/1118412202065657856

दरम्यान, ज्यांनी पक्षासाठी रक्त आटवले, घाम गाळला त्यांच्याऐवजी काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य दिले जात आहे. मी पक्षासाठी दगड खाल्ले, अपशब्द ऐकले पण पक्षामध्येच ज्यांनी मला धमकावले त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही हे दुर्देव आहे. असे टि्वट प्रियंका चतुर्वेदी यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या या नाराजीचा फटका उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies