मुंबई | मुंबईत सहा दिवसापूर्वी घडलेल्या एका खुनाचा धक्कादायक खुलासा क्राईम ब्रांचने केला आहे. 59 वर्षीय व्यक्तीची हत्या करून शरिराचे वेगवेगळे पार्टस सुटकेसमध्ये भरणारा आरोपी हा मृत व्यक्तीची मानलेली मुलगी असल्याचा खुलासा झाला आहे. लैंगिंक शोषणाला कंटाळून मुलीने प्रियकराच्या मदतीने पित्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सांताक्रूझच्या वाकोला परिसरात राहणाऱ्या बनेट रिबेलो यांची हत्या करून त्यांच्या शरीरचे तुकडे तुकडे करून समुद्री खाडीत फेकण्यात आले होते. माहीम बीचवर एका सुटकेसमध्ये शरीराचे काही भाग सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासला सुरुवात केली होती. गेले पाच दिवस अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून पोलिसांनी ही हत्या करणाऱ्या मृत रिबेलो यांच्या मानलेल्या मुलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आराध्या पाटील असे या 19 वर्षीय आरोपी मुलीचे नाव आहे. 16 वर्षीय प्रियकराच्या मदतीने तिने ही हत्या केल्याचे समोर आलंय.
रिबेलो हे मानलेली मुलगी म्हणजेच आरोपीचा लैंगिक छळ करत होते. तसेच तिच्या प्रेमास त्यांचा विरोध होता. यामुळे त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलीने दिली आहे. क्राईम ब्राँच ने या प्रकरणाचा तपास करून प्रकरण निकाली काढले आहे. सुटकेसमधील तुकड्यांवर मृताचे कपडे होते. या कपड्यावरील टेलरच्या नावावरुन पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.